बंडखोरी होऊ नये म्हणूनच भाजपशी युती तोडली - नारायण राणे

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2017 09:30 PM IST

Narayan rane21

27 जानेवारी :   पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणूनच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडली, अशी सडकून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली  आहे. युती तोडली नसती तर अर्धे शिवसैनिक पक्षातून बाहेर पडले असते, असा दावाही राणेंनी केला आहे.

राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्बळावर लढणार असल्याची गर्जना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवारी) गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत केली. याबाबत बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहेत.

महापालिका निवडणुकीत युती तोडायची, सत्तेत राहायचं, फरफटत जायचं, अपमान सहन करायचा याचं नाव शिवसेना असल्याची खास राणे स्टाईलमध्ये त्यांनी टीका केली  आहे. 25 वर्ष युतीत सडायला कोणी सांगितलं होतं, असा टोलाही राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेना स्वबळावर येणार नव्हती, मोदींमुळे, भाजपशी केलेल्या युतीमुळे शिवसेनेच्या जागा निवडून आल्या अशीही बोचरी टीका राणे यांनी केली आहे. मनपासाठी युतीतून बाहेर पडायचं आणि राज्याच्या सत्तेत राहायचं अशा भाषणाला काय अर्थ आहे, असा सवाल राणे यांनी केलाय. राज्याच्या सत्तेतूनही बाहेर पडला असते तर जनतेला वाटलं असतं की काही स्वाभिमान आहे असा टोलाही राणेंनी लगावला आहे.

एकीकडे युती तोडायची भाषा करायची दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार, असं कसं? याला युती तोडणं बोलतात का?, असा सवालही राणेंनी विचारला आहे. तसंच, मुंबई महापालिका निवडणूक झाल्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील त्यामुळे त्यांच बोलणं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही, असं राणे म्हणाले आहेत.

शिवसेनेबरोबरचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फड्णवीस यांनी युती तुटल्यानंतर परिवर्तन होणारच असं ट्विट केलं त्याची खिल्ली उडवत राणे यांनी परिवर्तन म्हणजे काँग्रेसची सत्ता येणार असं त्यांना अपेक्षित आहे असं म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close