मुंबईत काँग्रेसच्या वोटबँकला खिंडार ?

मुंबईत काँग्रेसच्या वोटबँकला खिंडार ?

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई

27 जानेवारी :  महाराष्ट्रात काँग्रेस आणि मुस्लीम हे आजवरचं समिकरण आता बदलत चाललय. मुंबई महापालिकेत तर काँग्रेसच्या या वोटबँकला खिंडार पडायला सुरुवात झालीए. का पाठ फिरवतोय आजवरचा काँग्रेसचा पाठिराखा वर्ग हे जाणून घेवूया.

Muslim-Vote-Bank

मुंबईत 28 टक्क्यांच्या जवळपास मुस्लिम लोकसंख्या आहे. हा वर्ग मतदानाबाबत फार उत्सुक नसला तरी त्यांची मतं दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. त्यामुळेच मुंबईत 2012ला 18 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. त्यातील 9 नगरसेवक एकट्या काँग्रेसमधून निवडून आले होते. पण काँग्रेसच्या याच वोटबँकला खिंडार पडायला सुरुवात झालीय.

नवाजुद्दीन रायन यांच्या पाठोपाठ काँग्रेसमधून दोनदा निवडून आलेल्या वकारुन्नीसा अन्सारी यांनीही कालच काँग्रेसला शेवटचा सलाम करत एमआयएममध्ये प्रवेश केलाय.

काँग्रेसच्या मुस्लीम वोटबँकला एमआयएमच्या मुंबईत येण्याचा फटका तर बसणार होताच. पण पक्षांतर्गत बंडाळीमुळे त्यात भर पडलीय. ज्याचा फायदा एमआयएम आणि सपाला होईल आणि महापालिकेतला मुस्लिम नगरसेवकांचा टक्का वाढेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 27, 2017, 9:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading