27 जानेवारी : सरकारी कार्यालयात देवदवतांचे फोटो लावायला बंदी करणारा आदेश मागे घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलं आहे. शिवसेनेचे नेते परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये देवदेवतांचे फोटो लावण्याची मनाई आणि काही धार्मिक कार्यक्रम साजरे करायला बंदी घालणारा अध्यादेश ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं काढण्यात आला होता. त्याला शिवसेनेनं तीव्र विरोध केला होता. हिंदुत्वावर आघात करणारा हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घ्या, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्र्यांना दिला होता. त्याचबरोबर, जर अध्यादेश मागे घेतला नाही तर होणाऱ्या परिणामांसाठी तयार रहा, असा रोखठोक इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा आदेश मागे घेण्याची मागणी केली. तर हा आदेश सरकारच्या वतीने काढलेला नसून हा ग्रामविकास खात्यातील अधिकार नसेल्या एका अधिकाऱ्याने काढलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही ताबडतोब हा अध्यादेश मागे घेतला असून, संबंधितअधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
मात्र, गेले चार दिवस या अध्यादेशाबाबत मंत्रालयापासून ते कर्मचाऱ्यांमध्ये जो असंतोष आहे, तो मुख्यमंत्र्यांना का जाणवला नाही, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा