'ब्रेक-अप के बाद' सेना भाजप पहिल्यांदाच आमने-सामने !

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2017 11:02 AM IST

'ब्रेक-अप के बाद' सेना भाजप पहिल्यांदाच आमने-सामने !

 

27  जानेवारी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच शिवसेना आणि भाजपचे खासदार आज (शुक्रवारी) पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळी शिवसेनेचे खासदार बैठकीला जाणार का, अशीही शंका व्यक्त होतेय. त्याचबरोबर, धार्मिक फोटोबाबत राज्य सरकारने काढलेलं परिपत्रक रद्द करण्याचं निवेदन देण्यासाठी शिवनेसेचं पाचही कॅबिनेट मंत्री आज सकाळी 10  वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

अनेक दिवसांपासून युती होणार की नाही यावर चर्चा रंगल्या होत्या. अखेर 25 वर्षांची युती काल संपुष्टात आल्याची घोषणा काल गोरेगावमधील शिवेसनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर शिवसेना नेत्यांकडूनही भाजपवर जोरदार टीका होताना दिसतेय. तर उद्धव ठाकरेंच्या आदेशासमोर मंत्रिपदाला आमच्यालेखी महत्त्व नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.

तर दुसरीकडे संसदेच्या प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील खासदारांबरोबर बैठक घेऊन राज्याच्या समस्या केंद्राकडे कशा आक्रमक पद्धतीने मांडता येतील यावर चर्चा करतात. यंदाचं बजेट 1 फेब्रुवारीला सादर होणार असून त्यात महाराष्ट्राला काय मिळणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. परंतु, युती तुटल्याच्या घोषणेनंतर, शिवसेना खासदार अधिवेशनात काय पवित्रा घेतात, याकडे सर्वांच लक्ष लगलं आहे. त्यांच्या भूमिकेचा अंदाज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत येऊ शकतो.

त्यामुळे महापालिकेतून निघालेलं वादळ मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची चिन्ह दिसून येत आहेत. आता सेनेचे मंत्री राजीनामा देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2017 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close