...तर काय करायचं हे त्यावेळी बघू, शरद पवारांची गुगली

...तर काय करायचं हे त्यावेळी बघू, शरद पवारांची गुगली

  • Share this:

sharad pawar neeee26 जानेवारी : एवढी वर्ष त्यांनी एकत्र काढली ते आता वेगळे झाले, त्यामुळं दु:ख झालं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसंच पाठिंब्याचा प्रस्ताव आला तर चर्चा करू अशी गुगलीही पवारांनी टाकली.

भाजप - शिवसेनेची युती अखेर तुटलीय. मुंबईत गोरेगावमध्ये झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकेरेंनीच ही घोषणा केलीय. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही शिवसेना आणि भाजपची युती तुटले असं भाकित वर्तवलं होतं आणि आज ते खऱं ठरलंय. युतीच्या या निर्णयावर शरद पवारांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. इतकी वर्ष शिवसेना आणि भाजप एकत्र राहिले. पण आज वेगळे झाले त्यामुळे दु:ख झालं असं पवार म्हणाले.

तसंच राज्याच्या सत्तेत शिवसेनेनं पाठिंबा काढला तर काय करायचं हे त्यावेळी बघू त्यांनी पाठिंबा काढावा आणि चर्चेला यावं तेव्हा ठरवू असं सूचक वक्तव्यही शरद पवार यांनी केलं. शिवसेनेनं जेव्हा भाजपला पाठिंबा देण्याचा नकार दिला होता त्यावेळी भाजपने राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केली होती. पण, हा पाठिंबा फार काळ टिकला नाही. अखेरीस शिवसेनेला सत्तेत सामील व्हावं लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 26, 2017, 11:01 PM IST

ताज्या बातम्या