...त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच -मुख्यमंत्री

...त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच -मुख्यमंत्री

  • Share this:

fadanvis_on_virodhak26 जानेवारी : जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

मुंबईतील गिरगावमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भाजप युती तुटल्याची घोषणा केलीये. एवढंच नाहीतर यापुढे महाराष्ट्रात यापुढे युती करणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब टि्वट करून प्रतिक्रिया दिली. सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. असं म्हणत जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तर 28 तारखेला गोरेगावला त्याच ठिकाणी भाजपचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.

आम्ही स्वबळावर निवडणुका लढायला तयार आहोत. कुठल्याही स्तरावर स्वबळावर निवडणूक लढायला आमची तयारी आहे. जरी युती तुटली असली तरी राज्य सरकारवर परिणाम होणार नाही. आमचं सरकार 5 वर्षे राहिल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 26, 2017, 9:05 PM IST

ताज्या बातम्या