उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2017 09:33 AM IST

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

26 जानेवारी : गेली 25 वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली, यापुढे महाराष्ट्राभरात कुठेही भाजपसोबत युती करणार नाही. महाराष्ट्रावर भगवा फडकवूनच दाखवणार असा निर्धार करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली. त्यांच्या भाषणातील हे ठळक मुद्दे....

मुंबईत युती तुटली, उद्धव ठाकरेंची गर्जना

महापालिका निवडणुकीसाठी युती करणार नाही - उद्धव ठाकरे

कुणाच्या दारात आता कटोरं घेऊन जाणार नाही -उद्धव ठाकरे

आता शिवसेना यापुढे महाराष्ट्रावर भगवा फडकवणार -उद्धव ठाकरे

25 वर्ष युतीमध्ये सडली -उद्धव ठाकरे

उद्या जर कुणी शिवसैनिकांनी बंड केलं तर त्याचे दात पाडण्याचे ताकद मला द्या - उद्धव ठाकरे

मला माझ्यासोबत चालणारे शिवसैनिक हवे आहेत पाठीत खंजीर खुपसणारे शिवसैनिक नको - उद्धव ठाकरे

युती करायची असेल तर मला जबाबदारीतून मुक्त करा,उद्धव ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा

पंतप्रधान तुमचा, मुख्यमंत्री तुमचा उद्या आमच्या घरात घुसणार तर शांत बसणार नाही -उद्धव ठाकरे

पद्म पुरस्कार हा गुरूदक्षिणा, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

हे सरकार कुणाचं आहे हा निर्णय घ्यायला कुणी सांगितलं -  उध्दव ठाकरे

ऑफिसातल्या देव देवांचे फोटो काढण्याच्या निर्णय काय घेतात- उध्दव ठाकरे

 समान नागरी कायद्यासाठी वटहुकूम काढा असा निर्णय घेण्याची हिंम्मत आहे का ?- उद्धव ठाकरेंचा सवाल

पारदर्शकतेच्या गप्पा मारताय मग कार्यालयात '#पूजाबंदी'चा निर्णय सेनेच्या मंत्र्यांचा विश्वासात घेऊन का घेतला नाही -उद्धव ठाकरे

सरकारी कार्यालयांमध्ये देवांचे फोटो काढण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू - उद्धव ठाकरेंचा इशारा

भाजप हा उधळलेला बैल त्याला वेसण घालावीच लागेल - उध्दव ठाकरे

 आधी राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणा - उद्धव ठाकरे

युतीची चर्चा झालीच कुठे? - उद्धव ठाकरे

शिवसेनेला अंधारत ठेवून निर्णय -उध्दव ठाकरे

पारदर्शकतेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका- उध्दव ठाकरे

शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी भाजपनं गुंड घेतले - उध्दव ठाकरे

भाजपनं पोलिसांचा गैरवापर करू नये - उध्दव ठाकरे

आमचं मुंबईशी नातं रक्ताचं - उध्दव ठाकरे

चर्चा करायची चर्चा सुरू झाली आणि दुसऱ्या बैठकीत 114 जागांची केली हा शिवसेनेचा अपमान नाही -उद्धव ठाकरे

आम्ही काम करून दाखवलं म्हणून हक्काने जागा मागितल्या थापा मारून नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close