युती तुटली, सेना स्वबळावर लढणार ; उद्धव ठाकरेंची घोषणा

 युती तुटली, सेना स्वबळावर लढणार ; उद्धव ठाकरेंची घोषणा

  • Share this:

uddhav_thackery_on_yuti26 जानेवारी : भाजप-शिवसेनेची युती अखेर तुटलीय. आजपासून शिवसेनेची नवी वाटचाल सुरू झाली आहे असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची मोठी घोषणा केलीय. यापुढे युतीसाठी कुणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही,  कुणासमोर झुकणार नाही, कुणासमोर वाकणार नाही, महाराष्ट्रात एकटचं लढणार आणि यापुढे युती करणार नाही अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.

युती तुटणार की स्वतंत्र लढणार ? या प्रश्नाभोवती आज मुंबईत गोरेगावमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरत चांगले खडेबोल सुनावले.  शिवसेना- भाजपची 1997 पासून युती आहे. शिवसेनेशी केलेल्या युतीमुळेच भाजप वाचलं. पण आता गरज संपल्यानंतर शिवसेनेला भाजपने अपमानाची वागणूक दिलीय.

भाजप- शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरूच नव्हती. पहिली बैठक झाली, या बैठकी पारदर्शकतेवर चर्चा झाली. दुसरीबैठक झाली त्या बैठकीत भाजपने 114 जागांचा मागणी केली. शिवसेनेचं मुंबईसोबत रक्ताचं नातं आहे. वेळप्रसंगी आम्ही रक्तदानही केलं हा इतिहास आहे. भाजप आमच्याकडे 114 जागेची मागणी करत आहे हा आमचा अपमान नाही का ?, उलट भाजपनेच आम्हाला युती तोडण्यासाठी भाग पाडलं. आता यापुढे कुठेही भाजपशी युती करणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.

भाजप हा उधळलेला बैल

भाजप हा उधळलेला बैल आहे, या बैलाला वेसण घालावीच लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट हल्ला केला. भाजप पारदर्शक कारभाराची भाषा करतं पण केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार पारदर्शक नाही, अशी टीका त्यांनी केली.

Loading...

'पूजाबंदी मागे घ्या नाहीतर रस्त्यावर उतरू'

सरकारी कार्यालयांमध्ये पूजाबंदी करण्याच्या अध्यादेशावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. हा अध्यादेश मागे घ्या नाहीतर आम्ही त्याची होळी करू, असा इशारा त्यांनी दिला. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारात घेतलं जात नाही, हा पारदर्शक कारभार आहे का ? असा सवालही त्यांनी भाजपला केलाय.

सगळे गुंड भाजपमध्ये

भाजपमध्ये गुंडांचा प्रवेश झाला. म्हटलं एक दोन गुंड आपल्या पक्षात पण घ्यावे, पण सगळे गुंड हे भाजपने पळवले आहे. आम्हाला या गुंडापुंडाची गरज नाहीये. आमचे शिवसैनिक हे मावळे आहे तेच आम्हाला खूप आहेत  असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चरख्यासोबतचा फोटो प्रसिद्ध झाला, त्यांनी गांधीजींचं चित्रही बाजूला काढलं. पण आता उत्तर प्रदेशात भाजपला हे राम म्हणायची वेळ आलीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'बंडखोरांचे दात पाडू'

मुंबई, पुणे नाशिकसह सगळ्या महापालिका आम्हीच जिंकणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. आमचं मुंबईशी रक्ताचं नातं आहे हेही सांगायला ते विसरले नाहीत. शिवसैनिक जर माझ्यासोबत असतील तर मला कशाचीच चिंता नाही, मला माझ्यासोबत चालणारे शिवसैनिक हवे आहे पाठीत खंजीर खूपसणारे शिवसैनिक नकोय, जर उद्या कुणी बंड केलं तर त्याचे दात पाडण्याशिवाय मी राहणार नाही असा सज्जड दमच उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...