बैलगाडा शर्यतीसाठी निवडणुकीनंतर अध्यादेश काढू -मुख्यमंत्री

  • Share this:

CM SPEECH26 जानेवारी : बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी, यासाठी निवडणुकांनंतर अध्यादेश काढणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

तामिळी जनतेच्या आंदोलनापुढे केंद्र सरकारला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि जल्लीकट्टूवरची बंदी उठवावी लागली. याच पार्श्वभूमीवर राज्यातही बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवावी अशी मागणी पुढे आली. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी  एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी निवडणुका संपल्यावर अध्यादेश काढण्यात येईल असं आश्वासन दिलं. तसंच सध्या आचारसंहिता असल्यामुळे अध्यादेश काढता येणार नाही असंही सांगितलं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे यावर्षी बैलगाडा शर्यती झाल्या नाहीत. आपल्या संस्कृतीचा भाग असल्यामुळे या शर्यतींना परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामीण महाराष्ट्रातून होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 06:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading