भाजपप्रमाणे काँग्रेसनेही सुरू केली 'वाॅररुम'

भाजपप्रमाणे काँग्रेसनेही सुरू केली 'वाॅररुम'

  • Share this:

congres_War_room26 जानेवारी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियातही आपण मागे राहू नये आणि प्रसार माध्यमांशी सतत संपर्कात राहता यावं यासाठी काँग्रेसनं वॅार रुम सुरु केली आहे.

मुंबईतील दादर इथं असलेल्या टिळक भवन कार्यालयात ही वॅार रुम सुरू करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या वाॅर रुमचं उद्धाटन करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाई जगताप आणि नसीम खान उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्ष कमी पडला अशी प्रांजळ कबुली चव्हाण यांनी या वेळी दिली. हे कार्यालय २४ तास सुरु असणार असून या ठिकाणी पक्षाचे ४-५ प्रतिनिधी उपलब्ध असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 26, 2017, 5:06 PM IST

ताज्या बातम्या