वर्ध्यात उष्माघाताचे 7 बळी

28 मेउष्माघातामुळे एकट्या वर्धा जिल्ह्यात गेल्या 48 तासांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भर उन्हात रस्त्यात पाणी न मिळाल्याने एका एसटी ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वर्ध्यातील गिरड इथे घडली. तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत.जळगावात उष्मा कायम डोक्यावर आग ओकणारा सूर्य, भर दिवसा ओस पडलेले रस्ते, सरकारी हॉस्पिटलच्या उष्माघात वॉर्डातील गर्दी अशी परिस्थती सध्या जळगावमध्ये पाहायला मिळत आहे. कडक ऊन आणि लोडशेडिंग यामुळे बाजारपेठाही ओस पडल्या आहेत.पण काही जणांनी याचाही गैरफायदा उचलण्यास सुरूवात केली आहे. अवघ्या एक रुपयाला मिळणारे पाणी पाऊच आता तीन रुपयांना विकले जात आहेत. हे पाऊच तयार करणार्‍या कंपन्यांनीच किंमती वाढवल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 28, 2010 02:01 PM IST

वर्ध्यात उष्माघाताचे 7 बळी

28 मे

उष्माघातामुळे एकट्या वर्धा जिल्ह्यात गेल्या 48 तासांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

भर उन्हात रस्त्यात पाणी न मिळाल्याने एका एसटी ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वर्ध्यातील गिरड इथे घडली. तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

जळगावात उष्मा कायम

डोक्यावर आग ओकणारा सूर्य, भर दिवसा ओस पडलेले रस्ते, सरकारी हॉस्पिटलच्या उष्माघात वॉर्डातील गर्दी अशी परिस्थती सध्या जळगावमध्ये पाहायला मिळत आहे. कडक ऊन आणि लोडशेडिंग यामुळे बाजारपेठाही ओस पडल्या आहेत.

पण काही जणांनी याचाही गैरफायदा उचलण्यास सुरूवात केली आहे. अवघ्या एक रुपयाला मिळणारे पाणी पाऊच आता तीन रुपयांना विकले जात आहेत. हे पाऊच तयार करणार्‍या कंपन्यांनीच किंमती वाढवल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...