राहुल द्रविडने नम्रपणे नाकारली बंगळुरू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2017 03:18 PM IST

राहुल द्रविडने नम्रपणे नाकारली बंगळुरू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी

rahul-dravid-1

26 जानेवारी :  भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन राहुल द्रविडने बंगळुरू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी नाकारलीय. खेळामध्ये संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवण्याची इच्छा त्याने व्यक्त केलीय. राहुल द्रविडचा जन्म बंगळुरूमधला. त्याचं शिक्षणही बंगळुरूमध्येच सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्येच झालं. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने पदवी घेतली. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधून एमबीए करत असताना त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.

राहुल द्रविडला टीम इंडियाची 'द वॉल' म्हणून ओळखलं जातं. द्रविडने 164 टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियासाठी योगदान दिलंय. त्याने त्याच्या कारकिर्दीत 13 हजार 288 रन्स केल्यायत. त्याच्या या कामगिरीमुळेच बंगळुरू विद्यापीठाने राहुल द्रविडला डॉक्टरेट देऊ केली होती.  27 जानेवारीला बंगळुरू विद्यापीठात हा कार्यक्रम होणार होता. पण राहु द्रविडने नम्रपणे ही डॉक्टरेट स्वीकारायला नकार दिलाय.

याआधी गुलबर्गा विद्यापीठानेही राहुल द्रविडला डॉक्टरेट देऊ केली होती. पण ही पदवीही राहुल द्रविडने नाकारली होती.  खेळाच्या क्षेत्रात संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याचा मी प्रयत्न करेन हेही राहुल द्रविडने म्हटलंय. राहुल द्रविडने 1996 साली टीम इंडियामधून त्याची कारकीर्द सुरू केली आणि 2012 मध्ये तो निवृत्त झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...