युतीचा निर्णय 'ऑन द स्पॉट' घेणार ?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 09:30 PM IST

Devendra and uddhav

26 जानेवारी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस ‌शिल्लक असूनही शिवसेना-भाजप युतीचा झुलत राहिलेला प्रश्न अखेर आज, गुरुवारी निकालात निघण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आज होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘एकला चलो’ची घोषणा करतील,  अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युती होणार की नाही याचा 'ऑन द स्पॉट' निर्णय होणार असल्याचं सामनानं वृत्त दिलं  आहे. सामन्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून अटीतटीची भाषा वापरण्यात आली आहे. पण दोन्ही पक्षांची युती होईल असाच अंदाज व्यक्त केला जातोय. त्यात काल पहाटे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याचं वृत्त आहे. त्यात मुख्यमंत्री स्वत: युतीसाठी सकारात्मक असल्याचं कळतंय.

पण मग जागांचा काय होणार हा प्रश्नच आहे. कारण शिवसेनेनं भाजपला फक्त 60 जागा देऊ केल्यात. एवढ्या कमी जागा अपमानजनक असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिलीय. आता तो अपमान पचवून आहे तेवढ्याच जागा भाजप स्वीकारणार की शिवसेना वाढवून देणार याचं चित्रं संध्याकाळी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...