राजपथावर घडलं भारताच्या सामर्थ्याचं, संस्कृतीचं दर्शन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2017 02:45 PM IST

राजपथावर घडलं भारताच्या सामर्थ्याचं, संस्कृतीचं दर्शन

CHITRARTH

26 जानेवारी : भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आज (गुरुवारी) दिल्लीतील राजपथावर संपन्न झाला. यावेळी भारतीय सैन्य जगाला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवलं. शिस्तबद्ध संचलन आणि श्वास रोखायला लावून धरायला लावणाऱ्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यासोबतच राज्य सरकार आणि केंद्राचे विविध चित्ररथदेखील उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होतं.

अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजपथावर स्वागत केलं.

नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कमांडोंनी पहिल्यांदाच राजपथावर संचलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.  यासोबतच संयुक्त अरब अमिरातीच्या 179 सैनिकांनी केलेले संचन हे यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...