S M L

मंगला एक्स्प्रेसमध्ये जन्माली 'मंगला'

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2017 11:52 PM IST

मंगला एक्स्प्रेसमध्ये जन्माली 'मंगला'

25 जानेवारी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या ज्योती झा या 29 वर्षाच्या विवाहितेने ट्रेनमध्येच एका सुंदर मुलीला जन्म दिलाय.

ज्योती झा आणि तिचा पती रविकुमार विश्वकर्मा हे दोघे मन्गलोर ते झाशी असा प्रवास करत होते. ज्योतीला प्रसुतीवेदना असह्य झाल्यावर चिपळूण जवळचा सावर्डे स्टेशनवर मंगला एक्स्प्रेस थांबवण्यात आली आणि सुदैवाने त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन नर्सेसनी गाडीतच ज्योतीची प्रसुती सुखरूप पार पाडली.

ज्योतीला नंतर जवळच असलेल्या डेरवण च्या वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे तिचे सर्व उपचार मोफत करण्यात आले. ज्योतीचा पती मंगलोर स्टेशनवर पाणीपुरीचा व्यवसाय करतो. गाडीतल्या सहप्रवाशानी या जोडप्याला त्याचवेळी आर्थिक मदतही केली विशेष म्हणजे मंगला एक्स्प्रेस मध्येच ज्योतीने कन्येला जन्म दिल्यामुळे तिच नावही मंगला ठेवण्यात आलंय. हे दोघेही सुखरूप असून लवकरच ते त्यांच्या झाशी या गावी रवाना होणार आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 11:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close