भाजपसोबत युती नकोच, सेना शिलेदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

भाजपसोबत युती नकोच, सेना शिलेदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

  • Share this:

Uddhav thackraydlhajhsd25 जानेवारी : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी युती करु नये अशी मागणी भाजप खासदार आणि संपर्कप्रमुखांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.

शिवसेना आणि भाजप युती तुटल्यात जमा झाली आहे. मात्र, अजूनही दोन्ही पक्षांचं तळ्यातमळ्यात सुरू आहे. आज 'मातोश्री'वर शिवसेना आमदार खासदार आणि संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना नेत्यांनी भाजपशी युती नकोच अशी भूमिका मांडली. नाशिक, पिंपरी- चिंचवडमध्ये शिवसेनेला स्वबळावर लढू द्यावं अशी मागणी सेना नेत्यांनी केली. शिवाय संभाव्य उमेदवारांची यादीही उद्धव ठाकरेंकडं दिली. या बैठकीला खा. शिवाजी आढळराव पाटील, खा. श्रीरंग बारणे, खा. हेमंत गोडसे, आ. नीलम गोऱ्हे यांच्यासह संपर्क प्रमुख बैठकीला हजर होते. आता उद्या उद्धव ठाकरे आपला निर्णय जाहीर करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 25, 2017, 10:26 PM IST

ताज्या बातम्या