आता कोणतेही वाद नको, राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना बजावलं

आता कोणतेही वाद नको, राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना बजावलं

  • Share this:

rahul_gandhi_nirupam25 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आता आणखी कोणतेही वाद नकोत असा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा सज्जड दम वजा संदेश पक्षाचे निरीक्षक भूपिंदरसिंग हुडा यांनी  मुंबईतल्या नेत्यांना दिला. सगळ्यांना सोबत घेऊन पक्षाला पुढे न्या अशा शब्दात त्यांनी संजय निरुपम यांना कानपिचक्या दिल्यात.

मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हुड्डांनी हा संदेश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा एकदिलानं शिवसेना आणि भाजपचा सामना करा अशा शब्दात त्यांनी बोलघेवड्या नेत्यांना संयम पाळा असा सल्ला दिला. जो काही वाद आहे तो पक्षांतर्गत आहे, आम्ही एकदिलानं निवडणुकीला सामोरं जाऊ, 'मत अनेक, काँग्रेस एक' असं म्हणत हुडा यांनी सगळ्या वादांवर अधिक बोलणं टाळलं.  या बैठकीला हुडा यांच्यासोबत अशोक चव्हाण, नारायण राणे, जनार्दन चांदूरकर, नसीम खान उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 25, 2017, 9:04 PM IST

ताज्या बातम्या