S M L

...तर उमेदवारांना मतदान करू नका, मराठा क्रांती मोर्चाचा फतवा

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2017 08:54 PM IST

maratha morcha for wab25 जानेवारी : 31 जानेवारीच्या चक्का जाम आंदोलनात सहभागी न होणाऱ्या उमेदवारांना मतदान करु नका असा फतवाच मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वय समितीनं काढलाय. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आणि महापालिका निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांसाठी हा फतवा काढण्यात आलाय. शिवाय 6 मार्चला मुंबईत निघणारा मुंबईतला मराठा मोर्चा हा शेवटचा मूक मोर्चा असणार आहे. त्यानंतर राज्यात काय होईल ते पाहा असा इशाराही समन्वय समितीनं दिलाय.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीची आज औरंगाबादेत बैठक झाली. या बैठकीत 31 जानेवारीच्या चक्काजाम आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली. जिल्हा परिषद आणि महापालिकेचे सर्व पक्षीय उमेदवार जे चक्काजाम मध्ये सहभागी होणार नाहीत. त्यांना मतदान करू नका असं आवाहन मोर्चाच्या वतीनं कऱण्यात आलं. आणि मार्चनंतरही मागण्या मान्य झाल्या नाही तर होणा-या परिणामाची जबाबदारी मुख्यमंत्री यांची राहिल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 08:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close