S M L

काँग्रेसमधल्या वादाबद्दल संजय निरुपम यांना देणार समज

Samruddha Bhambure | Updated On: Jan 25, 2017 04:45 PM IST

काँग्रेसमधल्या वादाबद्दल संजय निरुपम यांना देणार समज

25 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. काँग्रेसचे दिल्लीचे निरीक्षक भूपिंदरसिंग हुडा यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीआधी राज्यातल्या महत्त्वाची नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संजय निरुपम यांना समज जाणार दिली जाणार आहे.

काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक हॉटेल ट्रायडन्टमध्ये पार पडली. या बैठकीला भूपिंदरसिंग हुडा यांच्यासोबत अशोक चव्हाण, नारायण राणे, जनार्दन चांदूरकर, नसीम खान हे नेते उपस्थित होते.मुंबई काँग्रेसच्या बैठकीआधी हुडा यांनी वरिष्ठ नेत्यांकडून संजय निरुपम आणि इतर नेत्यांमधल्या वादाची माहिती आणि मतं जाणून घेतली. संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संजय निरुपम हे इतर कोणाचंही न ऐकता परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतात याबद्दल हे नेते नाराज आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी वाद होऊ नयेत यासाठी दिल्लीतल्या नेत्यांनी हुडा यांना मुंबईला पाठवलं, अशी चर्चा आह.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 04:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close