'स्लमडाॅग मिलेनियर'फेम देव पटेलला आॅस्कर नामांकन

'स्लमडाॅग मिलेनियर'फेम देव पटेलला आॅस्कर नामांकन

  • Share this:

dev new

25 जानेवारी : तुम्हाला 'स्लमडॉग मिलेनियर'मधला मुख्य अभिनेता देव पटेल आठवतोय का? या अभिनेत्याला यावर्षीच्या ऑस्करला सहाय्यक अभिनेता या विभागात नामांकन मिळालंय. हे नामांकन त्याला 'लायन' या चित्रपटासाठी मिळालं आहे. या पुरस्काराच्या स्पर्धेत त्याच्यासोबत जेफ ब्रिजेस, माहेरशला अली, लुका हेजस आणि मायकल शॅनन हे तगडे अभिनेते आहेत. याचसोबत देव पटेल ऑस्करमध्ये नामांकित होणारा तिसरा भारतीय नट ठरला आहे.

देव पटेल या भारतीय वंशाच्या अभिनेत्याचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. 2009मध्ये त्याने 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटात टायटल रोल केला. या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्करही मिळाला होता. यानंतर त्याने द लास्ट एअरबँडर, चापाए आणि द बेस्ट एक्सॉटिक मारीगोल्ड हॉटेल यांसारख्या चित्रपटात काम केलंय. लवकरच देव आपल्या 'लायन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 09:42 AM IST

ताज्या बातम्या