यूएईचे युवराज प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 25, 2017 04:27 PM IST

 यूएईचे युवराज प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

pm-modi-al-nahyan

25 जानेवारी :  संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ते प्रमुख पाहुणे असतील. राजपथावरच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्करासोबत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई लष्कराची एक तुकडीही सहभागी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युवराज शेख मोहम्मद बिन झायेद यांची आज बैठक झाली. तेलाचा व्यापार, नौदल प्रशिक्षण, दहशतवाद आणि यूएईनमधल्या भारतीयांच्या समस्या यावर दोघांमध्ये चर्चा झाली. यूएईमध्ये 26 लाख भारतीय राहतात. युएईच्या युवराजांच्या या भेटीत भारत आणि यूएईमध्ये 16 करार होणार आहेत.

याआधी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारत आणि यूएईमध्ये व्यापारविषयक करार झाले. संयुक्त अरब अमिरातीने भारतात 75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं आश्वासन याआधीच दिलंय. पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्यातही यूएईने भारताला पाठिंबा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...