एप्रिलपासून मुंबई विद्यापीठ ऑनलाइन तपासणार उत्तरपत्रिका!

एप्रिलपासून मुंबई विद्यापीठ ऑनलाइन तपासणार उत्तरपत्रिका!

  • Share this:

entrance-examneet-17-1476706059

25 जानेवारी : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील रखडणारे निकाल आणि होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठाने येत्या एप्रिलपासून सर्व शाखांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे यापुढे पेपर तपासनीसांना हातात पेन घेऊन पान उलटत बसावे लागणार नाहीये.

पेपर तपासणीमध्ये पारदर्शकता यावी, त्याचबरोबर तपासनीसाठी लागणारा वेळ आणि कष्ट वाचावे यासाठीच उत्तपपत्रिका ऑनलाइन तपासले जाणार आहेत. परीक्षा झाल्यावर सर्व उत्तरपत्रिका या स्कॅन केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तपासनीसाला एक आयडी तयार करून देण्यात येईल. या आयडीवर लॉग इन करून तपासनीसाला पेपर तपासता येणार आहे. या पद्धतीत पेपर तपासणीसाठी पाठवताना परीक्षार्थीचे नाव गुप्त राहते.

पेपर स्कॅन करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. पण या सगळ्यासाठी तेवढी सोय, तेवढे संगणक आहेत का.. आणि सर्वरला एवढ्या लाखो उत्तरपत्रिकांचा लोड पेलवेल का, यावर अनेक प्राचार्यांनी संशय व्यक्त केलाय.

दरम्यान, मुंबई विद्यापीठात दर सेमिस्टरला 402 परीक्षा होतात, आणि या प्रक्रियेत तब्बल 19 लाख 50 हजार उत्तरपत्रिका दरवर्षी तपासल्या जातात.

- एकूण 19.5 लाख पेपर ऑनलाईन चेक होणार

- शिक्षकांना युजरनेम आणि पासवर्ड देणार

- पेपर झाल्यावर उत्तरपत्रिका स्कॅन होणार

- स्कॅन करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट

- विद्यापीठाच्या सर्वरवर अपलोड होणार

- चेक करण्याचा वेळ कमी होईल, विद्यापीठाचा दावा

- फेरफार, इतर गैरप्रकार कमी करण्याचा हेतू

- 15 ते 20 दिवसांत निकाल लावण्याचं टार्गेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 25, 2017, 1:17 PM IST

ताज्या बातम्या