'फुगे'मध्ये निशिकांत कामतची खलनायकी भूमिका

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 25, 2017 12:40 PM IST

'फुगे'मध्ये निशिकांत कामतची खलनायकी भूमिका

nishikant kamat

25 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा निशिकांत कामत लवकरच आगामी ‘फुगे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'फुगे'मध्ये निशिकांत खलनायकाच्या भूमिकेत आहे.स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात निशिकांत कामत यांनी साकारलेला हा खलनायक सिनेरसिकांसाठी सरप्राईज पॅकेज ठरणार आहे.

यापूर्वी मराठीत ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केल्यानंतर तो प्रथमच ‘फुगे’तून पडद्यावर झळकणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात तो ‘भैरप्पा’ नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय.

या सिनेमातील निशिकांत यांनी साकारलेला खलनायक अगदी निराळा असून, तो प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा आहे.

स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘फुगे’ सिनेमात निशिकांत कामत गोव्यातील एका गाव गुंड्याची व्यक्तिरेखा साकारत असून, हा गुंड जितका रागीट आहे तितकाच प्रेमळ देखील आहे. या सिनेमातील त्याचे डायलॉग्सदेखील प्रेक्षकांना नादखुळा करणारे ठरणार आहे. 'एकच फाईट आणि वातावरण टाईट...'अशा धाटणीचे अनेक डायलॉग्स आहेत

Loading...

शिवाय या हटके रोलमधून निशिकांत पहिल्यांदाच विनोदी भूमिकेतून झळकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...