भारत अमेरिकेचा सच्चा मित्र - डाॅनल्ड ट्रम्प

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 25, 2017 02:20 PM IST

भारत अमेरिकेचा सच्चा मित्र - डाॅनल्ड ट्रम्प

modi-trump

25 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी काल पंतप्रधान मोदींना फोन केला.दहशतवाद, व्यापार आणि इतर अनेक विषयांवर दोघांनी चर्चा केली. भारत अमेरिकेचा खरा मित्र आहे,असं ट्रम्प म्हणाले. दहशदवादाविरोधात दोन्ही देशांनी भविष्यातही एकत्र राहणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

रशिया, चीन आणि इस्रायलच्या आधी ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांना फोन केला, ही महत्त्वाची बाब आहे. याचं कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये वादग्रस्त मुद्दे कमी आहेत, आणि आपल्या आसपासच्या समुद्रांमध्ये भारत आक्रमक किंवा विस्तारवादी नाही.त्यामुळे अमेरिकेला चीनसारखी डोकेदुखी भारतामुळे नाही.

ट्रम्प यांनी मोदींना या वर्षाच्या उत्तरार्धात अमेरिकेत यायचं निमंत्रण दिलं. ट्रम्पनी फोन केलेल्या पंतप्रधानांमध्ये मोदी पाचवे आहेत.याआधी कॅनडा,मेक्सिको,इस्राइल आणि इजिप्तच्या प्रमुखांना त्यांनी फोन केला.

पंतप्रधान मोदींनीही डाॅनल्ड ट्रम्प यांना भारतभेटीचं निमंत्रण दिलं. मोदींनी ट्विट करून हे सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...