एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची टोल कर्मचाऱ्याला मारहाण

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची टोल कर्मचाऱ्याला मारहाण

  • Share this:

Toll nw

24 जानेवारी :  नाशिक रोडवरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. टोलच फाटक लवकर न उघडल्याने शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने गोंधळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती आहे. संदीप घोंगडे असं मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या टोल कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्याच्यवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

एकनाथ शिंदे नाशिकवरून मुंबईकडे परतताना इगतपुरीजवळ असलेल्या या टोल नाक्यावर ही घडना घडली. या टोलनाक्यावर काम सुरू असल्याने दोन गेट बंद असून एकच गेट वाहतूकीसाठी खुला आहे. त्यात कॅबिनेट मंत्री जात असताना गेट उघडण्यात उशीर झाला म्हणून शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची टोल कर्मचाऱ्याशी बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने हाताने टोलनाक्यावरच्या काचा फोडल्या आहेत. याच काचा कर्मचाऱ्याच्या तोंडाही लागल्या आहेत. यामुळे गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज मागवून घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 09:45 AM IST

ताज्या बातम्या