काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण, भूपिंदरसिंग हुडांनी बोलवली तातडीची बैठक

काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण, भूपिंदरसिंग हुडांनी बोलवली तातडीची बैठक

  • Share this:

hooda-l

25 जानेवारी :  ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेलमधली गटबाजी उफाळून आल्यानं पक्षाने नेमलेले निरीक्षक भूपिंदरसिंग हुडा यांनी आज (बुधवारी) काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी कृष्णा हेगडे यांच्या भाजप प्रवेशानंतर संजय निरुपम यांच्यावर टिकास्र सोडल्याने काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आलं आहे. त्यातच उमेदवारी जाहीर करताना अजूनच वाद होतील असंही बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. यात पुन्हा एकदा निरुपम विरुद्ध इतर हा सामना रंगून जोरदार आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जातीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 25, 2017, 8:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading