S M L

शरद पवार यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार ?

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 11:12 PM IST

pawar_on_bjp_news24 जानेवारी : देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणार्‍या पद्म पुरस्कारांची लवकरच घोषणा होणार आहे. यंदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते  मुरली मनोहर जोशी यांनाही पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. यंदा जवळपास 150 जण पद्म पुरस्काराचे मानकरी असणार आहे. यंदा  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांना पद्म पुरस्कार जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. या दोन्ही नेत्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसंच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना मरणोपरांत पद्म विभूषण प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक यांची नाव आघाडीवर आहे. या व्यतिरिक्ती मनोरंजन क्षेत्रातून ऋषी कपूर, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता मनोज वाजपेयी, गायक-संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन, सोनू निगम, कैलाश खेर यांचा यादीत समावेश असल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 11:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close