S M L

फडणवीस सरकारचा 'पूजाबंदी' निर्णय तुघलकी -अरविंद भोसले

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 10:31 PM IST

फडणवीस सरकारचा 'पूजाबंदी' निर्णय तुघलकी -अरविंद भोसले

24 जानेवारी : सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये धार्मिक पूजा करणं किंवा धार्मिक फोटो लावल्यावर सरकारनं काढलेल्या परिपत्रकावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. हा निर्णय तुघलकी असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी केली आहे.

धार्मिक मुद्यांचा आधार घेत भाजपनं सत्तेचं सोपान गाठलं त्याच पक्षाला आता त्याचा विसर पडला आहे अशी टीका भोसले यांनी केली आहे. धार्मिक फोटोंना नमस्कार करुन जर कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असेल तर हरकत काय असा सवाल भोसले यांनी केला आहे. असा धाडसी निर्णय आधीच्या आघाडी सराकरनंही घेतला नाही असंही भोसले यांनी म्हणत भाजपला डिवचले आहे.

या निर्णयामुळे हिंदुंच्या भावना तुडवल्या  असून त्याविरोधात जनप्रक्षोभ निर्माण होईल आणि जनसामान्यांच्या भावनांसोबत शिवसेना कायम असते असं म्हणत भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबद्दल सामनातून अथवा शिवसेना पक्षप्रमुख स्वत: प्रतिक्रिया देतील असं भोसले यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 10:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close