S M L

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20साठी 'दंगल', दोन्ही संघ कानपूरमध्ये

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 09:46 PM IST

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20साठी 'दंगल', दोन्ही संघ कानपूरमध्ये

24 जानेवारी : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना कानपूर येथे होणार असून दोन्ही संघ तिकडे पोहोचले आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.

कानपूर येथे  ग्रीन पार्क स्टेडियममध्ये हा पहिला सामना खेळवला जाईल. एकदिवसीय सामन्याचा संघ तेथे पोहोचला असून इतर खेळाडू अजून आले नाहीयेत. तिकडे हॉटेल प्रशासन आणि चाहत्यांनी त्यांचं स्वागत केलं. आजचा दिवस दोन्ही संघ आराम करतील आणि नंतर सकाळपासून त्यांचा सराव सुरु होईल.

त्यांच्या स्वागतासाठी केक ठेवण्यात आला होता जो न कापताच ते सरळ आपापल्या रुममध्ये गेले. कसोटी सामन्यात 4-0 ने तर एकदिवसीय सामन्यात 2-1ने जिंकल्यानंतर भारतीयांचे लक्ष या मर्यादीत षटकांच्या मालिकेवर लागलेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 09:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close