S M L

सरकारी कार्यालयांमध्ये 'पूजाबंदी'

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2017 12:17 AM IST

सरकारी कार्यालयांमध्ये 'पूजाबंदी'

24 जानेवारी : पुरोगामी सरकारला साजेसा निर्णय राज्य सरकारच्या जलसंधारण आणि ग्रामविकास खात्यानं घेतलाय. या विभागांच्या ऑफिसेसमध्ये कोणत्याही धर्माच्या धार्मिक विधींना बंदी घालण्यात आलीये. शिवाय इमारतींच्या भिंतीवर धार्मिक घोषणा लिहण्यासही मनाई करण्यात आलीये. शिवाय देवदेवतांचे फोटोही लावण्यास सरकार निर्णयानं मनाई करण्यात आलीये.

सरकारी कार्यालयांतील सत्यनारायण पुजा आता कायद्यानुसार अवैध ठरणार आहेत. फडणवीस सरकारने यासंदर्भात शासननिर्णय काढला असून शासकीय कार्यालयांत सत्यनारायण किंवा तत्सम पुजा करण्यावर बंदी घातली आहे. मंत्रालय आणि राज्यभरातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सत्यनारायण पुजेसह अनेक धार्मिक विधीचे कार्यक्रम घेतले जातात. आता यापुढील  काळात अशा कार्यक्रमाना सरकारने कायद्याने बंदी करून पहिल्यांच पुरोगामी निर्णय घेतला आहे. दरम्यान, सरकारनं काढलेल्या परिपत्रकावर शिवसेनेने सडकून टीका केली आहे. हा निर्णय तुघलकी असल्याचा टीका शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी केली आहे.

सरकारी ऑफिसात 'पूजाबंदी'


- ग्रामविकास, जलसंधारणचे पुरोगामी पाऊल

 - कोणत्याही धर्माच्या धार्मिक विधींवर बंदी

- सण, उत्सव साजरे करण्यासही मज्जाव

Loading...

 - ऑफिसच्या भिंतींवर धार्मिक घोषवाक्यांना मनाई

- देव-देवतांचे फोटो लावण्यासही बंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 07:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close