S M L

'मनसे' सध्या काय करते...

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 07:26 PM IST

'मनसे' सध्या काय करते...

प्रणाली कापसे, मुंबई - 24 जानेवारी : मुंबई महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत असलेला पक्ष मनसे २०१७ च्या निवडणुकीत चर्चेतून गायब दिसतोय. मनसेत नेमकं चाललंय काय, कुणाला काही कळत नाहीये.

मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेता संदीप देशपांडे यांनी गेली पाच वर्ष महापालिका गाजवली. रोज नवं नव्या माहिती काढून त्यांनी सहकारी विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला, तर सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलं. पण मनसेचे असे काही नगरसेवक सोडले तर यावर्षीच्या निवडणूकीत मनसेची चर्चाच होतं नाहीये. पक्ष किती जागा लढवणार ?, कुठे, कसा प्रचार करणार?, कोण नवे-जुने चेहेरे निवडणूक लढवणार ?, या बाबत काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे पक्षाला मरगळ तर आली ना असा प्रश्न विचारला जातोय.

त्यावर गटनेता म्हणून संदीप देशपांडे सारवासारव करत असले तरी मतदारांना मात्र या परिस्थितीचं कोडं पेलतं. सध्या युतीचं गुऱ्हाळ चाललंय. त्या व्यतिरिक्त रणागणात असलेल्या राष्ट्रवादी,सपा ,एमआयएम यांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केलीय. काँग्रेसही लवकरचं यादी जाहीर करणार आहे.


पण मनसेत मात्र काहीच हालचाली नाही. पक्षाला ना नवे चेहरे मिळताहेत. ना जुने चेहरे टीकताहेत. गेल्या विधानसेभेला सुरू झालेली गळती महापालिकेतही सुरूच आहे. काही नगरसेवकांनी आधीच सेनेशी घरोबा केला आहे, तर माजी आमदार मंगेश सांगळे कालच भाजपत गेले आहेत. यावर पक्ष मात्र अजूनही थंड बसला आहे. मनसेचे पदाधिकारी या सर्व प्रकाराला वादळापूर्वीची शांतता असं गोंडसं नाव देत असले तरी विरोधक मात्र त्याला टवाळकीचा विषय बनवताहेत. ही वादळापूर्वीची नाही तर संपल्या नंतरची शांतता असल्याचं सांगताहेत. तर अंतर्गत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसे सेना-भाजप युतीचं काय होतं याची वाट पाहातेय. दोन्ही परिस्थितीत आपल्याला फायदा कसा उचलता येईल याची वाट पाहिली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 07:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close