S M L

...मग फाईल्स का मिळत नाही ?, खडसे भूखंड प्रकरणी कोर्टाने सरकारला खडसावलं

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 07:10 PM IST

court_khadse

विवेक कुलकर्णी, मुंबई, 24 जानेवारी : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत आली याची माहिती आजही सादर न केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच खडसावलं आहे.

एका आठवड्यात या प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत आली आहे याची माहिती देण्याचे कोर्टाने राज्य सरकारला आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. पण या प्रकरणाशी संबंधित फाईल्स झोटिंग आयोगाकडे असल्याची माहिती सरकारने कोर्टाला दिली. पण या फाईल्स या आठवड्याभराच्या कालावधीत त्यांच्याकडून का आणल्या नाहीत असा सवाल कोर्टाने विचारला, यावर आम्हाला याबद्दल रिट याचिका करावी लागेल असं सरकाराने म्हटल्यावर तुम्हीच तर समिती स्थापन केली आहे. तेव्हा तुम्हाला फाईल्स मिळवण्यात काय अडचण आहे अशा शब्दात कोर्टाने संताप व्यक्त केला.

सरकारनं उत्तर देण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत कोर्टाकडे मागितली पण कोर्टाने ६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे सरकारला आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 07:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close