पालिका कर्मचाऱ्यांचा पराक्रम,आजीबाई घरात असून केलं सील !

पालिका कर्मचाऱ्यांचा पराक्रम,आजीबाई घरात असून केलं सील !

  • Share this:

vasai-news24 जानेवारी : साडेसात हजार रुपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एका सत्तर वर्षांच्या आजीला फ्लॅटमध्ये कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. घरात कुणी नाही असं समजून कर्मचाऱ्यांची चक्क घराला सील ठोकलं होतं.

नालासोपारा पश्चिमेकडील गौरव गार्डन मध्ये सी विंग मध्ये अनघा पोळ राहतात त्यांची आई या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरून कुलूप लावून सील केलं. याचा थांगपत्ता या ७० वर्षांच्या आजी रोहिणी क्षीरसागर यांना नव्हता. जेव्हा शेजारील व्यक्तींनी सांगितला तेव्हा हा प्रकार लक्षात आला.

अनघा पोळ यांची घराची २ वर्षाची ७६७५ रुपयांची थकबाकी होती. त्यामुळे पालिकेच्या ठेका कर्मचाऱ्यांनी सील ठोकायला गेले असता बाहेरून कडी होती. त्यांनी दरवाजा ठोठावला पण काही प्रतिसाद न आल्याने सील ठोकलं. आतमध्ये आजी असल्याचं पालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सील काढत होते. मात्र, अनघा यांनी त्यावेळी नकार दिला. त्यांनी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला त्यांनी पालिकेत तक्रार करा असं सांगितलं त्यांनी उपायुक्तांना लेखी तक्रार दिली आहे.

दरम्यान, पालिका कर्मचाऱ्यांनी कोणी नसल्याचं समजून सील केलं त्यावेळी आमच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ सील काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यावेळी काढू दिले नाही. नंतर ते सील काढून टाकल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 24, 2017, 6:39 PM IST

ताज्या बातम्या