S M L

घोसाळकरांना तक्रार करणं पडलं महागात, सेनेतून हकालपट्टी ?

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2017 06:26 PM IST

घोसाळकरांना तक्रार करणं पडलं महागात, सेनेतून हकालपट्टी ?

24 जानेवारी : शिवसेनेच्याच नगरसेवकांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार करणं शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांना महागात पडलंय. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार आहे अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिलीये.

भाईंदरमधील एका कार्यक्रमातून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार अभिषेक घोसाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानूसार, निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या नगरसेवकांसह तिघांविरोधात आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी नगरसेविका शुभा राऊळ, शितल म्हात्रे आणि नगरसेवक अवकाश जाधव यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली नाराजी बोलून दाखवली. या अंतर्गत वादाची उद्धव ठाकरेंनीही दखल घेतलीये. या संदर्भात अभिषेक घोसाळकरांच्या हकालपट्टीचे आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.

संबंधित बातम्या

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close