नथुराम कोण ?, पोलिसांकडूनच आंदोलकांना गोळ्या घालण्याची धमकी

नथुराम कोण ?, पोलिसांकडूनच आंदोलकांना गोळ्या घालण्याची धमकी

  • Share this:

nagpur_police24 जानेवारी : 'हे राम नथुराम' या नाटकाच्या विरोधासाठी जमलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात येईल असं पोस्टर पोलिसांनी दाखवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

शरद पोंक्षे लिखित आणि दिग्द‌र्शित ‘हे राम...नथुराम’ या नाटकाचा प्रयोग रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याच्यावरील नाटक सादर केलं जाऊ देणार नाही, असा पवित्रा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. ‘महात्मा गांधी अमर रहे, नथुराम गोडसे मुर्दाबाद’ यांसारख्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी दोन पोस्टर्स झळकावले. या पोस्टरमध्ये आंदोलकांनी या ठिकाणहून जावं अन्यथा तुमच्यावर गोळ्या चालवल्या जातील असं लिहलं होतं. दरम्यान, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतांना पोलिसांच्या या कृतीचा काँग्रेसने विरोध केला आहे. पोलिसांनी गोळीबार करण्याची सुचना लिहलेले पोस्टर चुकुन दाखवले असल्याचं परिमंडळ दोन चे उपायुक्त राकेश कलासागर यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या 15 ‌वर्षांपासून या विषयावर मी नाटक करत असून नाटकाला कोर्टाची मान्यतादेखील आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या विरोधाला काहीही अर्थ नाही. केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटवण्यात येतो आहे. आक्षेपच घ्यायचा असेल तर वादग्रस्त वक्तव्यं करणाऱ्या ओवेसीला विरोध करावा’, असं मत नाटकाचे लेखक-दिग्दर्शक शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading