S M L

युती 99.9टक्के संपुष्टात, IBN लोकमतला सूत्रांची माहिती

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2017 09:30 PM IST

uddhav-and-devendra

24 जानेवारी : युती 99.9टक्के संपुष्टात आलीय, अशी माहिती IBN लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर लढवतील, अशी माहिती आहे.

दोन्ही पक्ष जागांबाबतच्या आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे युती तुटल्याचं अगोदर कोण सांगणार? हा प्रश्न आहे. त्यातच आजच्या 'सामना'त आर-पारची भाषा वापरण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपला जास्त जागा हव्या आहेत. मात्र महापालिकेतला मोठा भाऊ या नात्यानं सेनेला जास्त जागा हव्या आहेत.

90 पेक्षा जास्त जागा सेना भाजपला द्यायला तयार नाहीये. तर भाजप 114 पेक्षा कमी जागांवर ऐकायला तयार नाहीये. याचा परिणाम अर्थातच युती संपुष्टात येण्यावर झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 03:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close