S M L

कोल्हापूरमध्ये 20 नगरसेवकांची पदं धोक्यात

Sonali Deshpande | Updated On: Jan 24, 2017 02:06 PM IST

 कोल्हापूरमध्ये 20 नगरसेवकांची पदं धोक्यात

 

HIGH COURT

संदीप राजगोळकर,24 जानेवारी : राज्यात सध्या निवडणुकांची धांदल सुरू असतानाच आता कोल्हापूरमध्ये 20 नगरसेवकांची पदं धोक्यात आली आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणीचे दाखले सादर न केल्यामुळे महापौर हसिना फरास यांच्यासह 20 नगरसेवकांची पदं ही रद्द होण्याची शक्यता आहे.या 20 जणांमध्ये काँग्रेसचे 8, ताराराणी आघाडीचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, भाजपचे 2, शिवसेनेच्या 1 नगरसेवकाचा समावेश आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीचे दाखले या नगरसेवकांनी सादर केलेले नाहीत. 6 महिन्यांमध्ये हे दाखले सादर करावे लागतात.

राज्य सरकारने याबाबतचा अहवाल मनपा आयुक्तांकडून मागवला आहे. येत्या 15 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार असून जर कारवाई झाली तर 20 जणांची नगरसेवक पदं ही रद्द होऊन त्यांना 6 वर्षांसाठी अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जर पोटनिवडणुका लागल्या तर कोल्हापूरच्या राजकारणातले राजकीय संदर्भही बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान या नगरसेवकांनी आता न्यायालयात धाव घेतली असून उच्च न्यायालयात लवकरच याबाबत सुनावणी होणार आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 01:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close