S M L

मुंबईसाठी एमआयएमच्या पहिल्या यादीत 2 बिगरमुस्लिम उमेदवार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 24, 2017 03:49 PM IST

मुंबईसाठी एमआयएमच्या पहिल्या यादीत 2 बिगरमुस्लिम उमेदवार

24 जानेवारी :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षानं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात 18 जणांचा समावेश आहे. एमआयएम मुंबईत जवळपास 40-45 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

एमआयएम पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच स्वत:ला आजमावते आहे. पहिल्या यादीतील जवळपास सगळेच उमेदवार हे अपेक्षेप्रमाणे मुस्लिमबहुल भागातील आहे.

या यादीत ८ महिला उमेदवार आहेत तर त्यातील दोन बिगर मुस्लिम महिला उमेदवार आहे.  वाॅर्ड क्रमांक 189, सायन-धारावी मधून सुजाता भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वाॅर्ड क्रमांक 188 धारावीतून पुष्पा बलराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत चारकोप, दिंडोशी, अंधेरी, वांद्रे गोवंडी, चांदिवली, भायखळा, मुंबादेवी, मालाड मालवणी, सायन,धारावी या भागातील वाॅर्डांचा समावेश आहे. उद्या पक्षाची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्यावर लढवू असं एमआयएमचे मुंबई अध्यक्ष अब्दुल रेहमान शाकिर पटनी यांनी म्हटलं आहे. आम्ही धर्माचा विचार न करता जे कोणी जनतेची सेवा करायला तयार आहेत. अशाच व्यक्तींना उमेदवारी देत आहे असही पटनी यांनी म्हटलं आहे. आम्ही फक्त एकाच धर्माचा विचार ही आमच्याबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमजूत असल्याचंही पटनी यांनी म्हटलंय. 28 जानेवारीनंतर असादुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांच्या मुंबईत सभा होतील आणि त्यानंतर पूर्ण ताकदीने प्रचार करु अशी माहिती पाटनी यांनी दिली आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close