S M L

मुंबईसाठी शिवसेनेची 227 उमेदवारांची यादी तयार?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 24, 2017 03:35 PM IST

मुंबईसाठी शिवसेनेची 227 उमेदवारांची यादी तयार?

24 जानेवारी :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि विभागप्रमुखांची ‘मातोश्री’ इथं तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी 227 उमेदवारांची यादी तयार आहे. या यादीतील उमेदवार निश्चित करणे आणि राज्यात नेत्यांचे प्रचार दौरे आखण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एका दिवसाला दोन सभा घेणार.मुंबई, ठाणे, नाशिक पुणे येथे उद्धव यांची जाहीर सभा तर आदित्य ठाकरेंचा रोड शो होणारनागपूरमध्येही उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. तसंच, उद्धव ठाकरेंची शेवटची सभा ठाण्यात होणार.


31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे प्रचारासाठी गोव्यात जाणार.याशिवाय रामदास कदम, सुभाष देसाई, अमोल कोल्हे आणि नितीन बानगुडे पाटील यांचे राज्यभरात कार्यकर्ते मेळावे होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 12:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close