S M L

सुष्मिता सेन 'मिस युनिव्हर्स 2017'ची परीक्षक

Sonali Deshpande | Updated On: Jan 24, 2017 12:05 PM IST

सुष्मिता सेन 'मिस युनिव्हर्स 2017'ची परीक्षक

24 जानेवारी : अभिनेत्री सुष्मिता सेन हिची 'मिस युनिव्हर्स 2017' साठी परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. सुष्मिताने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली.

1994मध्ये सुष्मिताने 'मिस युनिव्हर्स' हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनी ती या स्पर्धेत सहभागी होणार आहे. पण यावेळी ती स्पर्धक म्हणून नाही तर परीक्षक म्हणून उपस्थित असेल.

सुष्मिताने आपला मेकअप करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यासोबत तिला एक संदेशही लिहिला आहे. या घटनेमुळे 23 वर्षांनी आज एक वर्तुळ पूर्ण होत असल्याचं सुष्मिताने यात म्हटलंय. मॉडेल आणि अभिनेत्री असणारी 41 वर्षीय सुष्मिता परीक्षक म्हणून काम करण्यासाठी खूपच उत्सुकच असल्याचं कळतंय.

30 जानेवारीला फिलिपिन्स इथे आयोजित करण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धेत रोशमिता हरिमूर्ती भारताचं प्रतिनिधित्व करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close