S M L

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नोटाबंदीचा फटका

Samruddha Bhambure | Updated On: Jan 24, 2017 12:29 PM IST

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नोटाबंदीचा फटका

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नोटाबंदीचा फटका बसला आहे. साहित्य संमेलन 10 दिवसांवर येऊन ठेपलं असतानाही खर्चाची ताळमेळ घालण्यात आयोजकांची कसरत सुरू आहे.

ठाण्यामध्ये काही वर्षांपूर्वी पार पडलेले साहित्य संमेलन 1 कोटी रुपयांमध्ये आयोजकांनी केलं होतं. यंदा साहित्य संमेलनाचा तीन दिवसाचा अपेक्षित खर्च 5 कोटींच्या घरात पोहोचला आहे.  मात्र आयोजकांकडून 1 कोटी 58 हजार रुपयेच जमले आहे. नोटाबंदी आणि लागू झालेली निवडणुकांची आचारसंहिता यांचा फटका बसल्याचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी डोंबिवलीमध्ये सांगितले.


राज्यमंत्री आणि स्वागत समितीचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही साहित्य संमेलनाला लोकांनी मदत करावी, असं आवाहन केलंय.

दरम्यान, निधीची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू असून विविध माध्यमातून निधी संकलन पूर्ण करण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. संमेलनासाठी देणगीदार, राज्य सरकार आणि अन्य माध्यमातून आत्तापर्यंत निधी एवढा निधी उभारण्यात आला असला तरी संमेलनाचे नियोजित साडेपाच कोटींचे बजेट गाठणे आयोजकांना कठीण दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2017 12:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close