गवत पेटून लागलेल्या आगीत जवळपास 60 काजू कलमं जळून खाक

गवत पेटून लागलेल्या आगीत जवळपास 60 काजू कलमं जळून खाक

  • Share this:

Ratnagiri123

24 जानेवारी :  कोकणात लागणाऱ्या वणव्यांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत करून वाढवलेल्या बागांची क्षणार्धात राख होताना दिसतेय. रस्त्याने जाणारा एखादा बेफिकीर वाटसरू सिगारेट न विझवता फेकून देतो आणि मग रस्त्याच्या कडेला असलेलं वाळकं गवत पेटून छोट्या आगीचा वणवा होतो. या वणव्यात  इतर झाडांसोबत काजू आणि आंब्याच्या बागाही  भस्मसात होतायत.

ही दृष्यं आहेत रत्नागिरीतल्या रातांबशेंडा गावातली. गवत पेटून लागलेल्या या आगीत रस्त्याच्या कडेला असलेली सुमारे  60 काजू कलमं जळून खाक झालीयत तर काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातल्या वैभववाडी तालुक्यातला पंधरा एकर उसही असाच जळून गेलाय. काही वेळा अशी आग माथेफिरुंकडून मुद्दाम लावली जात असल्याचं शेतकरी सांगतायत.

काजू तसंच आंब्याच्या पिकाला आगीपासून विमा सरंक्षण नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही . अशा परिस्थितीत आगीमुळे होणारं मोठं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच आपल्या बागेतलं वाळकं गवत काढून टाकावं असा सल्ला कृषी विभागाने दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 24, 2017, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading