News18 Lokmat

26 तारखेनंतर खरा अंक सुरू होईल -उद्धव ठाकरे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 24, 2017 12:02 AM IST

uddhav_in_ekvira23 जानेवारी : गोष्ट तशी गंमतीची आहे 'आय लव्ह यू' कोण म्हणतंय हा प्रश्न आहे कोण नाटकं करतेय ते पाहायचंय असं सांगत 26 जानेवारीनंतर खरा अंक सुरू होईल असं सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.

मुंबईतील ष्णमुखानंद हॅालमध्ये  शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं.यावेळी त्यांनी युतीच्या चर्चावरून  सडकून टीका केली. ज्यांचा माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल त्यांनी चालतं व्हावं असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.तसंच मला कुणाचीही पर्वा नाही तुमची सोबत असेल तर मी एकटा जायला तयार आहे अशी सादही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातली.

वचननाम्यावर विरोधकांच्या टीकेचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. वचनाम्यातल्या गोष्टी पूर्ण करायला पंतप्रधानांच्या जाहीरातीपेक्षा कमी खर्च येईल असा टोलाच उद्धव ठाकरेंनी लगावला. युतीचं काय होईल माहिती नाही. पण  खरा अंक 26 जानेवारीनंतर सुरू होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...