S M L

उद्धव जे बोलता ते करुन दाखवत नाही -नारायण राणे

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 08:07 PM IST

naryan rane on sena423 जानेवारी :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करत असलेलं शिवसेनेचं नेतृत्व गोंधळलेले असल्याची टीका काॅंग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. युती करावी की न करावी यापासून मुंबईसाठी काय करावं याबद्दल जाहीरनाम्यापर्यंत हा गोंधळ कायम असल्याची टीका राणे यांनी केली आहे. जे बोलतो ते करुन दाखवत नाही तो म्हणजे शिवसेना अशी टीकाही राणेंनी केली. जो बोलणार ते करणार असे शिवसेनाप्रमुख होते मात्र सध्या शिवसेनेत असं कोणी आत्ता दिसत नाही असा शिवसेनेचा खरपूस समाचार राणे यांनी घेतला आहे.

शिवसेनेनं जाहीर केलेल्या वचननाम्यातली कामं गेल्या २२

वर्षात का केली नाहीत असा सवालही राणे यांनी केला आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याचा मुंबईचा अभ्यास नाही अशी टीका राणे यांनी केली आहे.५०० स्क्वे.फुटांखालील घरांना मालमत्ता करांतून वगळल्या जाण्याच्या शिवसेनेच्या घोषणेवर टीका राणे यांनी आधी यांनीच मालमत्ता कर वाढवला आता हेच कमी करतायंत मग कर कशाला वाढवला होता असा प्रश्न शिवसेनेला विचारला आहे.भाजप आणि शिवसेना एकमेकांवर माफियागिरीचे आरोप करुन माफियाराज असल्याचं सिद्ध करतायंत आता लोकांनीच काय ते ठरवावं. जे काही आरोप किरीट सोमय्या, आशिष शेलार आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहेत त्यानुसार त्यांना मत मागण्याचा अधिकार राहिलेला नाहीये असं राणे यांनी म्हटलंय.

काॅंग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्या भाजप प्रवेशानरुन बोलताना भाजप आणि शिवसेना जसं भांडतायंत त्यामुळे त्याचं हसं झालंय तसं आपलं हसं होऊ नये याची काळजी घ्यावी असा टोमणावजा सल्ला राणे यांनी काॅंग्रेस नेत्यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 08:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close