S M L

मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनजवळची आग आटोक्यात,म.रे. पूर्वपदावर

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2017 09:41 PM IST

मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनजवळची आग आटोक्यात,म.रे. पूर्वपदावर

 

23 जानेवारी : मुंबईतील मस्जिद बंदरजवळ दाणाबंदर येथील झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात आलीये. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. 2 मुलं जखमी झाली असून त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र,आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आग आटोक्यात आल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आलीये.

मस्जिद बंदरजवळ दाणाबंदर येथील एलसी कंपाऊंडला संध्याकाळी भीषण आग लागली होती.ही झोपडपट्टी मध्य रेल्वेच्या ट्रॅकला लागून असल्यामुळे आगीचे लोट ट्रॅकपर्यंत जाणवत होते. खबरदारी म्हणून तातडीने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे ऐन संध्याकाळी वाहतूक ठप्प झाल्यामुळे चाकरमान्याचे काही काळ हाल झाले.


12 टँकर, 8 अग्निशमन दलाच्या बंबानी घटनास्थळी धाव घेऊन काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवलं.या आगीमध्ये रमजान इम्रान शेख, सलमान इम्रान शेख, जीरारो, रेहमान शेख, विनायक आणि समीर ही सहा मुलं या आगीत भाजली आहेत. यापैकी दोघांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 08:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close