बिग बीच्या जागी रणबीर करणार केबीसीचं सूत्रसंचालन

बिग बीच्या जागी रणबीर करणार केबीसीचं सूत्रसंचालन

  • Share this:

kbc

23 जानेवारी : छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चं सूत्रसंचालन आता अमिताभ बच्चनऐवजी रणबीर कपूर करणार आहे.

या शोचं सूत्रसंचालन कित्येक वर्षे अमिताभ बच्चन करत होते.एका सिझनमध्ये शाहरूख खानने सूत्रसंचालन केलं होतं. पण त्याला कमी प्रतिसाद मिळाला होता. पण त्यानंतर अमिताभ बच्चननेच सूत्रसंचालनची जबाबदारी उचलली.

सूत्रांच्या माहितीनुसार 'कौन बनेगा करोडपती'चा नवा सीझन अमिताभ ऐवजी रणबीर कपूर करणार आहे .पण चॅनेलकडून सध्यातरी अधिकृतरित्या असं काही सांगितलेले नाही.

अमिताभची सूत्रसंचालनची पद्धत प्रेक्षकांना खूप आवडते.खास करून 'कंप्यूटर जी लॉक किया जाए' हा डायलॅाग तर लोकांना प्रभावित करतो.या शोनं खूप लोकांना करोडपती बनवलंय. हा शो ३ जुलै २०००मध्ये पहिल्यांदा सुरू झाला.त्याचा पहिलाच सिझन हिट झाला होता.

रणबीर कपूरवर ही मोठी जबाबदारी आहे. पाहू या आगे आगे क्या होता है?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 05:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading