News18 Lokmat

नाशिकच्या कालिका मंदिरात चोरी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2017 06:04 PM IST

नाशिकच्या कालिका मंदिरात चोरी

nashik mandir

23 जानेवारी : नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कालिका मंदिरात धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मंदिरातील सोन्याच्या मुकुटासह चोरट्यांनी जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय.

कंसारा मंडळी ट्रस्टच्या या मंदिरात चोरी झाल्यानं पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून नेमका किती मुद्देमाल चोरट्यानी लंपास केलाय याची देखील तापासणी केली जातेय.

मंदिरात बुलेटप्रूफ काच असताना देखील चोरट्याने प्रवेशद्वार तोडून दागिने लंपास केलेत. पोलिस तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...