S M L

वाहतूक पोलिसातल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे कोर्टाचे आदेश

Sonali Deshpande | Updated On: Jan 23, 2017 05:12 PM IST

वाहतूक पोलिसातल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे कोर्टाचे आदेश

mumbai high court434

23 जानेवारी : मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई बाहेरील वाहतूक पोलीस विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय. यासंबंधी स्टिंग आॅपरेशन करून पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी प्रत्येक गुन्ह्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचं रेटकार्ड ठरलेलं आहे, असा सनसनाटी दावा उच्च न्यायालयात केला होता.

या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने अतिरिक्त पोलीस महासंचालक एसीबी यांना मुंबई आणि इतर ट्रफिक विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून चौकशीचा अहवाल पुढील ६ आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिलेत.भ्रष्टाचारात सामील होण्यास नकार दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ होतो,असंही त्यांनी यावेळी आपल्या याचिकेव्दारे न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली पाहिजे असं मत देखील यावेळी न्यायालयाने व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 03:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close