डाॅनल्ड ट्रम्प यांच्याकडे आता नवा मोबाईल

डाॅनल्ड ट्रम्प यांच्याकडे आता नवा मोबाईल

  • Share this:

Trump_phone

23 जानेवारी : अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती डाॅनल्ड ट्रम्प यांनी आपल्या खास वस्तूला अलविदा केलंय.ही खास वस्तू आहे त्यांचा अँड्राईड मोबाईल. ज्या मोबाईलने त्यांना राष्ट्रपती होण्याकरता लोकांपर्यत पोचवलं, त्याच मोबाईलला आता त्यांना टाटा बायबाय करावं लागतंय. महासत्ता असलेल्या अमेरिकेचं सर्वोकृष्ट पद सांभाळताना डोनाल्ड ट्रम्प एका नवीन मोबाईलचा वापर करतील .

अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना जुन्या मोबाईलचा त्याग करावा लागतोय. 'न्यूयार्क टाइम्स'च्या रिपोर्टनुसार अमेरिकी सीक्रेट सर्विस मंजुरी प्राप्त मोबाईलचा वापर करण्यात येईल ,ज्याचा नंबर काही महत्त्वाच्या लोकांकडेच असेल.

अमेरिकेच्या राष्ट्रपतींना हॅकर्सपासून वाचवण्यासाठी हा मोबाईल विशिष्ट पद्धतीने तयार केलाय. बराक ओबामाच्या पावलावर पाऊल टाकत डोनाल्ड ट्रम्पही खास मोबाईल वापरणार आहेत. ओबामा आधी ब्लॅकबेरी मोबाईल वापरत असत. मग आयफोनचा वापर करायला सुरुवात केली.

मागच्या वर्षी ओबामा म्हणाले होते, 'सीक्रेट सर्विसद्वारा राष्ट्रपतींना एक खास मोबाईल देण्यात आला. त्यातले सुरक्षितेच्या दृष्टीने मोबाईलचे सर्व फीचर काढून टाकले. काही बदलही त्यात करण्यात आले .यामध्ये फोटो काढण्याची आणि टेक्स मेसेज करण्याची सुविधाही नव्हती. यात गाणीही ऐकू शकत नव्हते.

ट्रम्प यांचा मोबाइल फोनही ओबामासारखा असू शकतो . कारण अँड्राईड फोनला हॅक करणं सोपं आहे पण आयफोनला हॅक करणं अशक्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading