मुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा, 'जे बोलतो ते करून दाखवतो'

मुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा, 'जे बोलतो ते करून दाखवतो'

  • Share this:

Shivsena vachanma

23 जानेवारी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी वचननामा जाहीर केला आहे. शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस आमच्यासाठी फार महत्वाचा आहे म्हणूनच आज आम्ही वचननामा जाहीर करून मुंबईच्या विकासासाठी वचनबद्ध होत आहोत, असं उद्धव यांनी सांगितलं. त्याचबरोबर, आजपासून महिन्याभरात सर्व महापालिकांवर सेनेचा भगवा फडकलेला दिसेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

जे बोलतो, ते करुन दाखवतो या टॅगलाईनखाली शिवसेनेने वचननामा प्रसिद्ध केला आहे. आजपर्यंत अनेक 'जाहीरनामे' आले आणि पुढे देखील येतील, पण आमचा मात्र 'वचननामा' असल्याचं आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सुरक्षित , स्वच्छ , सुंदर मुंबईसाठी हा वचननामा असल्याचं ते म्हणाले. 500 फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सवलत,आरे कॉलनीचा हरित पट्टा कायम ठेवणार,सफाई कामगारांसाठी नवीन सुविधा, यासह अनेक मुद्द्यांचा वचननाम्यात समावेश आहे.

शिवसेनेचा वचननामा

- 500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, 700 फुटांपर्यंत सवलत

- मुंबई परिसरात चार जलतरण तलाव

- सफाई कामगार आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना

- डबेवाल्यांसाठी डबेवाला भवन

- शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट विक्री करण्यासाठी केंद्रे

- पालिकेची संगीत अकादमी

- बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मोफत विमा कवच

- गणवेशातल्या विद्यार्थ्यांना शालेय प्रवास मोफत

- देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये विघटन प्रकल्प

- आरे कॉलनीचा हरित पट्टा कायम ठेवणार

- मुंबईत पर्यटन क्षेत्र उभारणार

- ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

- जुन्या विहीर पुनरुज्जिवीत करण्याचा प्रयत्न

- मुंबईकरांना 24 तास पाणी

- वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनावर भर

- मधुमेहावर उपचार करणारी विशेष केंद्र

- आरोग्यसेवा आपल्या दारी नवी योजना

- पालिका रुग्णालयात जेनेरिक मेडिकल कक्ष

- पालिका शाळांमध्ये आत्मरक्षण कक्ष

- सफाई कामगारांसाठी अत्याधुनिक साहित्य

-रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी स्टँड उभारणार

-खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 02:01 PM IST

ताज्या बातम्या